*|MC_PREVIEW_TEXT|*

अंक-४, जुलाई – आगस्त, 2020
     
                                                                         

कोविड-१९ प्रतिसाद

वृत्तपत्र

कार्यकारी संचालकांच्या डेस्क वरून 
कोविड १९ महामारीने भारतात जीवन उध्वस्त केल्यानंतर सुमारे सहा महिन्याने त्याने समाजासमोर आरसा धरून त्याला खरं रूप दाखवून दिलं आहे. हे चित्र काही आनंददायी नाही. कारण या चित्रात गरिबांची हतबलता दिसते. परिस्थिती खूप चांगली असते तेव्हाही त्यांना त्यांच्या अत्यंत प्राथमिक गरजा भागवताना अडचणी येतात आणि  त्यांना लक्षात ठेवून उभ्या केलेल्या सार्वजनिक यंत्रणांचा त्यांना  किंचितसा  आधार असतो किंवा नसतोच. ज्या लोकांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थे सारख्या योजना ज्या लोकांना समोर ठेवून बनवल्या गेल्या आहेत त्यापासून तेच लोक सहेतुक वगळलं जातं का प्रश्न विचारणं रास्त ठरेल.  भारतातील शहरामध्ये सर्वात हतबल लोकांना त्यांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी आम्ही मदत करत असताना देश स्थलांतरीतांवरच्या संकटांचं सावटाखाली असताना त्यांच्यासाठी महत्वाच्या अधिकाराबाबत आम्ही सरकार आणि संबंधित  इतरांसोबत जनवकालतही करत आहोत. आमच्या वृत्तपत्रात लोकांचे- आमच्या उपक्र्मात कळीचा सहभाग असलेल्या सर्वसामान्य लोकांचे आवाज नोंदवले आहेत. नव्या आणि जुन्या योजनांचा व्यापक लाभ मिळत असेल तर ही माहिती सर्वात अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी. या वृत्तपत्रात त्यांच्या समस्या, आजही त्यांच्या घरात असलेली अन्नटंचाई, खूप आक्रसलेल्या रोजगाराच्या संधी, त्यांच्या मुलांचं शिक्षण या आणखी काही समस्या आहेत. त्यासोबत महामारीची भिती आणि बदलत्या मोसमाचे परिणाम सोसावे लागत आहेत ते वेगळे. देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून आम्ही तुमच्यापर्यंत त्यांचे आवाज लवकरच आणत आहोत.
अखिला सिवदास
शिक्षण

ऑनलाईन शिक्षण काही कामाचं नाही असं  पालक सांगताहेत 
नवी दिल्ली, जयपूर, अजमेर, जोधपूर : या महामारीत मुलांचं विशेषत: गरीब मुलांचं शिक्षण ही मोठी आपत्ती झाली आहे. सीफार ज्या शहरात गरीब आणि वंचित वर्गाबरोबर काम करते तिथल्या कुटुंबामध्ये शिक्षण ‘ एकदम बंदच आहे’ आणि मुलं आणि त्यांचे पालक यांच्या ‘धडपडी’ला काहीच यश येत नाहीये. “साधारण ७० टक्के मुलं सरकारी शाळेत जातात आणि बाकीची खाजगी शाळेत जातात”, असं पूर्व दिल्लीत राहणाऱ्या प्रियाने सांगितलं. शाळा पूर्ण फी आकारत आहेत आणि प्रामुख्याने तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देत आहेत. “खाजगी शाळा पूर्ण फी आकारतात. लोकांकडे ती फी देण्यसाठी ना हातात काम आहे ना पुरेसे पैसे” ती म्हणाली. त्याप्रमाणेच त्यांच्याकडे स्मार्टफोन, टॅबलेट, संगणक अशी उपकरणंही त्यांच्याकडे नाहीत. “मुलांना ही उपकरणं घेऊन द्यायची त्यांची ऐपत नाही.” जोधपुरमधील माता का कुंड इथल्या कौसल्या चं पण हेच म्हणणं आहे. “शाळा सुरु नसल्यासारखीच आहे. उपकरणाच्या मदतीने शिक्षण गरीब कुटुंबाना परवडणार नाही.” ती म्हणाली.  
दिल्ली आणि जयपूर सहित इतर शहरातील रहिवाश्यांनी सांगितलं की बऱ्याच मुलांचे पालक अशिक्षित असून त्यांना तंत्रज्ञानाची समज कमी आहे. दिल्ली, जयपूर, जोधपुर आणि अजमेर इथल्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांच्या याच प्रतिक्रिया आहेत. स्वत:च्या मालकीची उपकरणं, इंटरनेट जोडणी नसणे याबरोबर पालकांची तंत्रज्ञान ओळख नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रभावी होत नाही अशी कारणं सांगितली जातात. अनेक कुटुंबाकडे एकच स्मार्टफोन असतो तो मुलांच्या वडिलांकडे असतो आणि ते दिवसभर घराबाहेर असतात असं अनुभव आहे. “शा ळेचे वर्ग नेहमीच्या वेळेवरच चालतात. सकाळी फोन घरात नसेल तर मूल अभ्यास करू शकत नाही आणि संध्याकाळी वडील घरी परत आल्यावरही त्याला अभ्यास करता येत नाही,”अजमेरची चंदा म्हणाली.
पालकांनी मुलांना मदत करावी म्हणून दिल्लीमध्ये शाळा त्यांना तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अनेक कुटुंबात ते शक्य नाही कारण पालकांना ही नवी कौशल्य शिकणं अवघड आहे. “ही उपकरणं वापरण्याचं आमचं कौशल्य प्राथमिक स्वरूपाचं आहे” प्रिया म्हणते. मुलांकडे उपकरणं असतील तर मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही दुसरी समस्या आहे. जयपूरच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील विजय कंवर म्हणतात, मुलांकडे स्मार्टफोन असला की त्यांचं मन गेम खेळण्याकडे आणि इतर अपकडे धावत असतं त्यामुळे शिक्षक काय शिकवताहेत याकडे त्यांचं लक्ष लागत नाही. “ऑनलाईन वर्ग आणि प्रत्यक्ष वर्गासारखा चालू शकत नाही कारण सगळ्या मुलांवर देखरेख करता येत नाही.” त्या म्हणाल्या.   
गृहपाठाची पानं छापणं ही आणखी एक समस्या आहे. “शाळांना गृहपाठ आणि अभ्यास कागदावर करून हवा असतो आणि ते त्या कागदपत्रांच्या इलेक्ट्रोनिक प्रती पाठवतात त्या पालकांना छापाव्या लागतात. अनेक ठिकाणी हे छापलेली पानं अभ्यास पूर्ण केल्यावर शाळेत जाऊन द्यावी लागतात. गरीब कुटुंबातली, गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना इंटरनेट आणि प्रिंटर इतक्या सहः उपलब्ध नसतो. कागद छापायला लागणारा आर्थिक खर्च पण त्यांना परवडणारा नसतो, त्या म्हणाल्या.

रोजगार

छोटे व्यवसाय कोसळले आहेत’
नवी दिल्ली, जयपूर, जोधपुर, अजमेर : शहरात पुन्हा ट्राफिक जाम होऊ लागलं आहे पण म्हणून रोजगार पुन्हा सुरु झालाय असं नाही. घरकामगार, वाहनचालक, हंगामी कामगार, बांधकाम कामगार आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचे रोजगार पूर्ववत झालेले नाहीत. काही कामं सुरु झाली असली तरी परिस्थिती बदल्लेली आहे. सीफार प्रत्यक्ष परिस्थिती माहीत असून महामारीच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबियांना मदत करत आहे. उत्तर भारतातल्या अनेक शहरात कार्यरत असलेल्या सीफारच्या कर्मचाऱ्यांनी लोक अत्यंत कमी उत्पन्न किंवा उधार पैशावर जगत आहेत असं कळवलं आहे.
जयपूरच्या आमगढ वसाहतीत काम करणारे सीफारच्या समुदाय व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय म्हणाले, काही व्यवसाय थोड्या प्रमाणात सुरु झाले आहेत, उदाहरणार्थ न्हावी, मिठाईवाले पण त्याच्याकडे ग्राहक येत नाहीत. “आमच्या वस्तीतले न्हावी, हलवाई हे काम नसल्याने घरीच बसले आहे. शहरातलं जीवन ठप्प झाल्यामुळे त्यांची गरजच पडत नाही आहे नाहीतर हलवाई सतत पुरी आणि मिठाई विकत आणि न्हावी केस कापत असत.  परंतु कोविड १९ मुळे सगळे बाहेरचं खायला किंवा न्हाव्याकडे केस कापायला घाबरत आहेत.” ती म्हणाली. दिल्लीतील कल्याणपुरी मधील यशोदा म्हणते काम मिळणं खूप अवघड झालं आहे पुरुष आणि बायका दोन्ही घरीच आहेत. त्यांच्या वस्तीतल्या जास्त बायका घरकामगार म्हणूनच काम करतात त्यांना आता कोणीच कामाला बोलावत नाही आहे.
“एकतर लोक त्यांना कामावर बोलावत नाहीत किंवा बोलावलं तर आठवड्यातून दोन–तीन दिवस, दोन तीन दिवस साचलेलं काम त्यांच्याकडून करून घेतात आणि केलेल्या कामाचा पूर्ण मोबदलाही देत नाहीत”.
कामगारांना मजुरी कमी देता यावा म्हणून त्यांच्या पूर्वीच्या कामाचं स्वरूप बदललं आहे. उदा. महामारी अगोदर ७.५ किलो खेळणी जोडून पॅक करण्यासाठी प्रियाला ८० रुपये मिळत होते. आता तीच मजुरी ६० रुपये करण्यात आली ती किती किलो  खेळणी जोडू शकत असेल ? “संपूर्ण कुटुंबाने मिळून एक दिवस काम केलं तर ते ७.५ किलोचा एक गठ्ठा पूर्ण करू शकतात.” ती म्हणाली.
जयपूरमधला गाड्या दुरुस्त करणारा राकेश सांगतो ९० टक्के लघु व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. “लहान व्यवसाय म्हणजे अगदी छोटे धंदे म्हणजे गाडीवर भाजी विकणं, वस्तीतलं किराणा मालाचं दुकान किंवा छोट्या छोट्या वस्तू विकून थोडे पैसे कमावत होते. अशा लोकांकडची सगळी ठेव संपली आहे आणि हे किरकोळ धंदे चालवण्या इतपतही पैसे त्यांच्याकडे नाहीत.” तो म्हणाला. राकेशकडे विशेष कौशल्य असलं तरी तरी त्याच्या कामाला मागणीच नाही. “काम अजिबात नसल्यासारखंच आहे.” सीफारची एक स्वयंसेवक म्हणाली तिच्या नवऱ्याकडे टॅक्सी आहे गेल्या काही महिन्यात ती फक्त दोनदा भाड्याने गेली आहे. “माझा नवरा बिहारला जाऊन बांधकाम मजुरांना एकदा घेऊन आला आहे.एका मुकादमाने हे काम दिलं” राजस्थानमध्ये काय कामगार उपलब्ध नाहीत का? “पण बिहार वरून कामगार आणणं मुकादमाला स्वस्त पडतं.” ती म्हणाली. त्या दोन ट्रिपा झाल्यानंतर तो घरीच बसून आहे. आम्ही जे काय किडूकमिडूक साठवलं होतं त्यावर आमची गुजराण चालू आहे. आम्हाला काही कर्ज पण घ्यावं लागलं. उत्पन्न कमी झालं किंवा नसलं तरी खर्च तसेच नियमित चालू आहेत. अन्न आणि धान्य, मुलांचं शिक्षण आणि घरभाडं हे कौटुंबिक खर्च टाळताच येणारे नाहीत.
बहुतांश शहरात घरमालकांनी भाडी माफ केलेली नाहीत. “काही घरमालक वास्तीतालेच आहेत.त्यांनी भाडेकरूना भाडं भरण्याची मुदत वाढवून दिली आहे पण भाडं माफ केलेलं नाही.” प्रियाने सांगितलं. गरिबांमध्येही सर्वात जास्त गरीब असलेले आणखी भरडले गेले आहेत. जोधपूरमध्ये फळं विकणारा हरिष रद्दी विकतो आणि त्याच्याकडे एक रिक्षा आहे. त्याचं काम अत्यावश्यक सेवेत मोडतं त्यामुळे या काळातही तो काही कमाई करू शकला आहे. “पण अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी गेल्या काही महिन्यात काहीच कमाई केली नाही. आत्ताही त्यांना काम करण्याच्या संधी खूप कमी किंवा कधी मध्ये मिळतात. हा काळ खूप कठीण आहे “ तो म्हणतो.

अधिकार

नवीन रेशन कार्ड येण्याची प्रतीक्षा, इ कुपन खूपच कमी आणि कधीतरी उपलब्ध असतात.  
नवी दिल्ली, अजमेर, जोधपूर : महामारी आल्यानंतर जाहीर झालेल्या टाळेबंदीमुळे बहुसंख्य अकुशल कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांची कामं ताबडतोब बंद झाली. सरकार आणि संस्था यांनी दिलेल्या रेशनवर अवलंबून राहण्याची नोबत आली. टाळेबंदी उठ्वल्यावर सरकारी मदत बंद झाली पण लोकांचा उत्पन्न बंदच होतं. “पोट भरण्यासाठी या लोकांना आजही मदतीचे गरज आहे.” अजमेरच्या गंज भागातली चंदा सांगत होती. या भागातल्या बहुतेक लोकांकडे रेशन कार्ड आहे पण त्यातल्या फक्त निम्म्या लोंकांना त्यावर  रेशन मिळतं.
“ही राशनकार्ड २०१३मध्ये बनवलेली आहेत पण त्यातल्या निम्म्या कार्डावर रेशन मिळतंय आणि इतरांना मिळत नाही,” ती म्हणाली. सरकारतर्फे फक्त एकदा  जून महिन्यात रेशन मिळालं आहे.  ती म्हणाली.
दिल्लीत खिचरीपूर भागात काम करणारे कार्यकर्ते म्हणाले ,”त्याना सरकारकडून दोनदा ई कुपनवर रेशन मिळालं. “पहिल्या वेळेला दुकानदारांनी ई कुपन स्वीकारल्यामुळे आम्हाला धान्य मिळालं पण दुसऱ्या वेळी त्यांनी हे कुपन घेतले नाहीत.”  प्रियाने सांगितलं. पहिली ई कुपन फोनवर आली ती काही दुकानात स्वीकारली त्यात काही अडचण आली नाही पण दुसऱ्या वेळी आलेल्या कुपनवर दुकानाची नावं लिहिलेली नसल्याने त्यामुळे लोक एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात राहिले आणि दुकानदारांनी त्यांना त्यावर धान्य देण्यास नकार दिला.” तिने सांगितलं. अनेक कुटुंबाना प्रयत्न करूनही रेशन कार्ड मिळत नाही ही दुसरी समस्या आहे. जोधपूरमध्ये काम करणारी कौसल्या सांगते तिच्या भागात अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत.
“प्रत्येकाला रेशन कार्ड मिळणार असं नेहमी सांगितलं जातं. आम्हीही संबंधित अधिकाऱ्याना भेटलो त्यालाही काही महिने झाले पण त्यांना अजूनही रेशन कार्ड मिळाली नाहीत,” तिने सांगितलं.
स्थलांतरितांची समस्या झाल्यापासून गरीब लोकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळावा त्यासाठी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी गरीब लोकांना रेशन कार्ड मिळवून द्यावीत अशी अपेक्षा होती. परंतु, ती तातडी आता कमी झाली आहे असं वाटतं.  दिल्लीतल्या खिचरीपूर इथे राहणाऱ्या याशोदाचा तर हाच अनुभव आहे. तिने २०१५ साली रेशन कार्डसाठी अर्ज केला होतं. पाच वर्ष होऊन गेली त्यानंतरही अनेक अर्ज केले तरी आज तिच्याकडे रेशन कार्ड नाही. “मी गरीब बाई असून कमी मजुरी मिळणारी कामं करते. सध्या ती कामंच नाहीत आणि माझ्याकडे रोजच्या गरजा पुरवण्याइतके पण पैसे नाहीत. ती म्हणते.
इतर शहरातल्या अनेक लोकांनी अन्न मिळवण्याची मोठी समस्या असतानाही खूप कुटुंबाना खूप कमी सहाय्य मिळालं आणि सरकारकडून जे मिळालं तेही थांबलं. “जरा आजूबाजूला पाहिलं कि सगळीकडे हे लोक दिसतात.” असं प्रिया सांगते.

पाणी, स्वच्छता आणि आरोग्य

जयपूरच्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात  घाण वास येणारं पाणी घरात येतं.
जयपूर: “आम्हाला पावसाची भीती वाटते “असं मंजू म्हणते. जयपूरच्या बाबा रामदेव नगर या गरीब वस्तीमध्ये मजू राहते. भारतातल्या पाणी टंचाई असलेलेल्या वाळवंटी राज्य असलेल्या राजस्थानमध्ये कोणतरी असं विधान करणं  कदाचित अनुचित वाटेल पण तिला हेच म्हणायचं आहे. दरवेळी पाउस पडला कि गटारं भरून वाहू लागतात, बांधलेली कच्ची घरं उध्वस्त होतात आणि नळाला घाण पाणी येऊ लागतं त्याने माणसं आजारी पडतात आणि त्याची स्थिती आणखी बिकट होते. “घरात घाण पाणी शिरलं कि लोंकाना रडू येतं. या पाण्यात रस्त्यावरची शौच आणि घाण मिसळलेली असते. खूप पाउस पडला तर पाणी जोरात घरात शिरतं आमचं सगळं सामान, कपडे आणि गाद्या भिजून जातात. असं झालं की माणसं मोडून पडतात, रडतात,” ती सांगते.
जयपूरच्या गरीब वस्त्यांमध्ये पाणी, स्वच्छता आणि आरोग्य  यांची वस्तुस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी सीफारने नुकतंच एक सर्वेक्षण केलं , त्यांची निरीक्षणं काही महिन्यात जाहीर केली जातील. काही समस्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात पण सर्वांनी मिळून मात करण्यासारखे अनेक सामायिक प्रश्नही असतात. गरीब वस्तीत घरं जवळ जवळ असतात आणि वस्त्यामध्ये नियोजनाचा अभाव असतो. “इथे खूप कच्ची घरं आहेत विटांनी बांधलेल्या घराचा दर्जा पण सुमार आहे. विजय हि वस्तीतील रहिवासी म्हणते. सतत झालेल्या पावसामुळे ढासळलेल्या घरांचे विडीयो सीफारला पाठवण्यात आले. “माझं घर वाहून गेलं” संजय म्हणाला, “माझं सगळं सामान गेलं. आमच्याकडे खायला एक दाणा उरला नाही. डोक्यावर छप्पर नाही. आम्ही काय करूं? आम्हाला ताबडतोब मदतीची गरज आहे”
रहिवाश्यांनी पाठवलेल्या इतर दृश्यात रस्त्यावर कमरेइतकं पाणी साचलं आहे, पाणी घरात घुसलं आहे, घरातलं सामान पाण्याखाली बुडालेलं आहे. “ हे नेहमीचच आहे. पावसाळ्यात लोकांची हालत खराब असते.” मंजू म्हणाली. पावसामुळे वस्तीत येणारं पाणी पण दुषित येतं.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते तर  पावसाळ्यात पाणी अत्यंत दूषित असतं. अगदी नळाच्या पाण्यालाही माणसाच्या शीचा वास येतो. “ कालच, लोकांना पाणी दिसायला घाण होतं आणि त्याला वाईट वासही येत होता. “ती म्हणाली. तिची मैत्रीण संजना हिला खराब पाण्यामुळे उलट्या आणि जुलाब होत आहेत. “ अनेक लोक आजारी असून त्यांना जुलाब, ताप, सर्दी आणि पडसं,त्वचेवर फोड येणं आणि डोळ्याचा संसर्ग झाला आहे.” मजू म्हणाली. त्यांना कोविड १९ झालाय अशी शंका येऊ नये म्हणून तापासारखी लक्षणं सांगायला लोक घाबरताहेत”. “ते स्थानिक दवाखान्यात जात आहेत. पण काहीजण त्यांचा आजार लपवत आहेत. “ट्रान्सपोर्ट नगर जवळ राहणारा राजेश सांगत होतं.
 “जयपूरमध्ये पाऊस पडत आहे आणि प्रत्येक पावसाबरोबर टेकडीवरून खूप पाणी खाली येतं आणि वस्तीच्या बरोबर मध्यभागी असेलेल्या खड्ड्यात पाणी भरतं,” राजेश सांगत होतं. दुसरा एक रहिवासी म्हणाला सगळीकडे पाणी साचल्याने  वस्तीत चालणं मुष्कील होतं. एरवीही या भागातला कचरा नियमित उचलला जात नाही. पावसाळ्यात तर अवस्था आणखी वाईट होते. सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे एक अभियंता यांनी नाव न सांगता माहिती दिली. शहराच्या जय भागात पाणी साचतं तिथे पंपाच्या मदतीने पाणी काढलं जातं.
“मी जिथे राहतो त्या विद्याधर नगर मध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय.” गरीब वस्त्यांमध्ये नियोजनाचा अभाव असतो आणि अनधिकृत असल्याने इथे घरं नित बांधलेली नसतात आणि इथल्या नागरी सेवा अपुऱ्या असतात,” असं एक वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणाले. 
सखल भागात पाणी साचणारच असं जयपूर महानगरपालिकेचे एक अधिकारी म्हणाले. बाबा  रामदेव नगरमध्ये असे काही भाग आहेत. “एक पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असुन तिथे पूरासंबंधी तक्रारी स्वीकारल्या जातात.” ते म्हणाले.
त्याच्या भागात  काम करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित सरकारी यंत्रणेकडे लोक जातील यासाठी सीफार काम करत आहे.

प्रवासाची साधनं नसल्याने बायका कामावर जाऊ शकत नाहीत.

नवी दिल्ली: नवी दिल्लीत बदरपूर इथे राहणारी सीमा रोज घराबाहेर पडायची आणि एकटी प्रवास करून तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायची. घराबाहेर पडल्यावर ती बस स्टॉपवर जाते आणि बसची वाट पाहते. खूप वेळ वाट पहावी लागली तरी त्यासाठी तिची तयारी असते. “खूप गर्दीच्या वेळी तिला खूप जास्त तासन तास वाट पहावी लागते “ती सांगत होती. खूपच जास्त वेळ लागत असेल तर ती ऑटो रिक्षाने जाते. तिला जाण्यासाठी १२५ रुपये लागतात म्हणजे फक्त जाण्या- येण्याच्या प्रवासाला २५० रुपये लागू शकतात. ते परवडण्यासाठी मला त्याहून जास्त पैसे कमावता आले पाहिजेत.” ती म्हणाली.
टाळेबंदी हटवल्यानंतर कामं  करण्यास परवानगी मिळाली आणि महिला आणि पुरुष दोघेही घराबाहेर पडले. कामं दिवसेंदिवस कमी होत असताना  रोजगार मिळवणं हे स्त्रिया आणि पुरुषांसाठी मोठं आव्हान झालं. काम मिळवण्यासाठी त्यांना आणखी दूर जावं लागलं. सध्याच्या शरीर दुरिच्या नियमामुळे दिल्ली वाहतूक मंडळाच्या सार्वजनिक बसेस चालू असल्या तरी एका बस मध्ये जास्तीत जास्त २० प्रवासी नेण्यास परवानगी आहे आणि महिलासाठी आरक्षण उपलब्ध नाही. सुरुवातीलं त्या बस स्टॉपवर पोहोचायच्या आणि तासनतास उभ्या राहिल्या तरी त्यांना बस मिळत नसे. “बसेस अगोदरच भरलेल्या असायच्या त्यात पुरुषच जागा बळकावयाचे आणि अनेक तास उभं राहूनही बसमध्ये जागा मिळायची नाही.  बायकांनी खूप प्रयत्न केले तरी बरेचदा त्या मागेच राहतात.” ती म्हणाली.
भावना, दक्षिण दिल्लीत राहते. ती म्हणाली, तिला कधीच बसमध्ये जागा मिळत नाही तिला शेअर रिक्षा घ्यावी लागते. महिन्याला तिला १२ हजार मिळतात त्याटेल ३ हजार तिला प्रवासावरच खर्च करावे लागतात. काहीवेळा वाहन मिळालं नाही म्हणून मी कामाला जात नाही,“ ती म्हणाली.
अनेक महिलांनी बस मिळत नाही किंवा ऑटो रिक्षाचं जास्तीचं भाडं परवडत नाही  म्हणून काम करणं सोडून दिलं आहे. गौतमपुरीची रहिवासी सरोज डिफेन्स कॉलनीमध्ये घरकामगार म्हणून काम करते. “मी बस पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बसेस नेहमीच भरलेल्या असतात. मी महिन्याला ७००० रुपये कमवते त्यामुळे मला ऑटो रिक्षा परवडत नाही. त्यामुळे मी आता घरीच बसून आहे,” ती म्हणाली.
पूर्वी बस स्टॉपवर कामावर जाणाऱ्या  जास्त बायका असायच्या पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे. “त्या आता घरीच आहेत” ती म्हणाली. याहि समस्या ऐकल्यावर दिल्ली सरकार मधील एक वरिष्ठ अधिकारी (शहर बस वाहतूक प्रमुख नाही) कोविड १९ महामारी मध्ये संसर्ग टाळण्यासाठी शरीर दुरी पाळण्याची खबरदारी घेण 
आवश्यक आहे, सरकारला  सूचना केल्यास ते महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचा विचार करतील. 

मदतकार्य – जुलै – ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी  
  सेंटर फॉर अडव्होकसी अँड रिसर्च